//सर्व शाखांमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध //      //शुद्ध सोन्यावर ७५% पर्यन्त कर्ज सुविधा उपलब्ध //      अत्यंत आकर्षक कर्ज योजना      // शेती विकास कर्ज//      //औद्योगिक कर्ज //      //व्यापार, व्यवसायसाठी नजरगहाण कर्ज //      // कॉन्ट्रॅक्ट लोन //       //वैयक्तिक कर्ज //      // कन्झुमर लोन //      //शैक्षणिक कर्ज //       //वाहन खरेदी कर्ज//      // घर बांधणी कर्ज //

सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात
संस्थापक

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (दादा) संगमनेर हा तसा दुष्काळी तालुका . विडी कामगारांची मोठी संख्या या तालुक्यात कार्यरत होती . ग्रामीण जीवन प्रचंड हलाखीचे होते. ग्रामीण भागाला विकासाच्या प्रवाहात आणणे मोठे जिकरीचे काम होते. कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. आण्णासाहेब शिंदे, महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचेकडून सहकार चळवळीची प्रेरणा भाऊसाहेब थोरात यांनी घेतली.

सहकाराशिवाय संगमनेर तालुक्याचा विकास होऊ शकत नाही हे सूत्र लक्षात आल्यानंतर संगमनेर तालुक्यातील गावोगावाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाऊसाहेब थोरात यांनी सहकारी संस्थांची स्थापना केली. विविध कार्यकारी सोसायट्या, दूध संस्था, पाणी वाटप संस्था आणि पतसंस्था यांची उभारणी केली. संगमनेर येथे घुलेवाडीच्या बरड माळरानावर साखर कारखाना, दूध संघाची उभारणी केली.